KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध…

kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिकांनी लेखी हरकती नोंदवून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्हाला या भ्रष्ट पालिकेत राहायचं नाही, असा समितीचा ठाम पवित्रा आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, केडीएमसीने आजवर त्यांना कोणत्याही सुविधा पुरवलेल्या नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांची देण्यात आलेल्या नसून, पालिका केवळ कर वसुली करते, पण सुविधा देत नाही, असा गंभीर आरोप या गावातील गावकऱ्यांनी केला आहे.
आमच्या २७ गावांना जबरदस्तीने पालिकेत ठेवण्यात आले आहे. आता यातून आम्हाला बाहेर काढा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.