kalyan
कल्याणमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय…

kalyan – स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर महात्मा फुले पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १० मुलींची सुटका करण्यात आली असून, नौशाद शेख, योगेश चव्हाण, भीमसिंग नाईक या चालक, मालक, मॅनेजरला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील ‘अवंतरा’ स्पा याठिकाणी छापा टाकला असता, त्याठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले.
दरम्यान, सदर प्रकरणात पोलिसांनी त्याठिकाणाहून १० मुलींची सुटका केली असून, चालक, मालक, मॅनेजरला अटक केली आहे.