कल्याणमध्ये एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक…

kalyan – पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत.
पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने दोन अज्ञात इसमांनी कल्याण पश्चिमेतील अत्रे हॉल जवळील सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम दगडाच्या सहाय्याने तोडले परंतु त्यांना एटीएम मधील पैसे काढला आले नाही. परंतु यात एटीएमचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. सदर बाबत सेंट्रल बँक मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर दोघांना अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे व तपास पथकातील पोलीस हवालदार प्रेम बागुल, पोलीस हवालदार रमाकांत पाटील. पोलीस हवालदार रवींद्र भालेराव, पोलीस हवालदार परमेश्वर बाविस्कर, पोलीस शिपाई अरुण आंधळे व पोलीस शिपाई राहुल इशी यांनी केली आहे.