दौंडच्या यवतमध्ये दोन गटात राडा…

pune – पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून हा राडा झाला. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमध्ये शुक्रवारी सकाळी एका गटाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर दुपारी बारानंतर यवतमध्ये दोन गट भिडले. त्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. जमावातील काही लोकांकडून घरांची, दुकानांची जाळपोळ करण्यात आली, दुचाकी पेटवून देण्यात आल्या या वादानंतर यवतमधील आठवडे बाजार देखील बंद करण्यात आला.
दरम्यान, ही तणावपूर्ण परिस्थिती निवाळण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.