उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

new delhi – भारत निवडणूक आयोगाने नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल.९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आयोगाने या निवडणुकीसाठी मतदार संघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात.