मुंबई
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक…

mumbai – शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कमलेश राय यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या टप्प्यात राय यांनी ८ लाख रुपये स्वीकारले होते. तर आज (शुक्रवारी) दुसऱ्या टप्प्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.