मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ झा पोलिसांच्या ताब्यात…

kalyan – कल्याण मधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झा याला अखेर मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला होता.
कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. हि तरुणी कल्याण पूर्वमधील नांदिवली येथील श्री बालचिकित्सा क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. आरोपीचे नाव गोकुळ झा असे आहे. तर, पीडित तरुणीचे नाव सोनाली कळासारे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना सोमवारी (२१ जुलै) सायंकाळी ६.४५ दरम्यान घडली. सोनाली नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी करत होती. डॉक्टरांच्या केबिनमध्ये MR बसले होते. दरम्यान, गोकुळ झा नातेवाईकांसोबत तेथे आला होता. डॉक्टरांच्या केबिनमध्ये MR बसले होते. त्यामुळे सोनालीने त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यावेळी गोकुळ झा याला त्याचा राग आला आणि त्याने सोनालीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोकुळ झा ला ताब्यात घेतले.