मुंबई

बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड…

mumbai – महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणात संस्थेचे मालक निखिल नरेश वालेचा यास अटक करण्यात आली आहे.

ही व्यापार संस्था दि. ८ सप्टेंबर, २०२१ रोजी वस्तू व सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत झाली असून, संबंधित व्यक्तीने कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात न प्राप्त करता, तसेच कोणत्याही वस्तूंची देवाण-घेवाण न करता, फसवणूक करणाऱ्या पद्धतीने बनावट बीजकांच्या आधारे ITC प्राप्त केल्याचे निदर्शनास आले आहे.

तपासादरम्यान व्यापाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर भेट दिल्यानंतर असे आढळून आले की, आरोपीने १७.०३ कोटी रुपयांचे बनावट ITC अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्राप्त केले असून, ३.०३ कोटी रुपयांचे अतिरिक्त ITC चुकीच्या पद्धतीने GST विवरणपत्रांमध्ये दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी कोणतीही वस्तू अथवा सेवा प्रत्यक्षात प्राप्त झालेली नव्हती.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांनी निखिल वालेचा यास दि. ३० जुलै २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page