धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी…

dombivali – दत्त भक्तांच्या धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात (डोंबिवली) गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील दत्त भक्तांनी राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्याकडे मागणी करणारे पत्र दिले आहे.

गिरनार गुरुशिखर वरील दत्त महाराजांची मुर्ती काढून जैन धर्मातील नैमिनाथ यांची मुर्ती ठेवण्यात आल्याची पोस्ट एका आय डी वरून सोशल मिडीयावर तसेच व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक गिरनारी भक्तांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
हे पत्र राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना देण्यात आले आहे. त्यावेळी दत्त भक्त महेश जायगुडे, मंदार हळबे, प्रसाद मराठे, तेजस पाटील, प्रकाश मोरे, अभय छत्रे आदी उपस्थित होते.