ठाणे

गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; एकास अटक…

ambernath – अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार करण्याची हातभट्टी उध्वस्त करुन एकास ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आदेश गायकर असे याचे नाव असून, पोलिसांनी ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आदेश पंडित हा अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी अंबरनाथ मधील जय गोलोबा चाळ समोर, मोकळया मैदानात, व्दारली पाडा येथे छापा टाकून, गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त करून त्याठिकाणाहून गावठी दारू आणि साहित्य असा एकूण ३,१५,९५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच आदेश गायकर याला अटक करून सदर प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध – २, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/ठाकुर, पोहवा/ पाटील, पोहवा/शिंदे पोहवा/ गायकवाड, पोहवा/ जाधव, पोहवा/ गडगे, पोहवा/ राठोड, पोहवा/ कानडे, मपोहवा/पावसकर, मपोहवा/ कांबरी, पोना/ हासे, पोना/ मधाळे, चापोना/ हिवरे, पोषि/ वायकर, पोषि/ ढाकणे, पोषि/ पाटील, पोषि/शेजवळ, मपोषि/ भोसले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page