डोंबिवली
KDMC चे कर्मचारी पत्ते खेळण्यात व्यस्त; वॉर्ड अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…

dombivali – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 10/ई प्रभाग मधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दावडी गाव, रीजन्सी येथील कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत पत्ते खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील काही कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. तरी देखील ते याठिकाणी पत्ते खेळताना दिसत आहेत.
दरम्यान, प्रभागा मधे काम करण्यासाठी कर्मचारी अपुरे आहेत अशी माहिती दिली जाते जर कर्मचारी अपुरे असतील तर हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते कसे काय खेळतात असा प्रश्न आता निर्माण झाला आहे?
या कर्मचाऱ्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त कारवाई करणार का? कि फक्त बघ्याची भूमिकाघेणार हे पाहावे लागणार आहे.