ठाणे

एम.डी. बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त…

thane – एम.डी हा अंमली पदार्थ बनवणाऱ्या उत्तराखंड मधील कारखान्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या घटक ५ पोलिसांनी छापा टाकून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करून ३ जणांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, कासारवडवली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ कडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी याआधी सदर गुन्ह‌यात विशाल बिपीन सिंह, मल्लेश रमेश शेवाला या दोघांना अटक करून त्यांच्याकडून अटक १०.९३ ग्रॅम (३५,०००/- रु. किंमीचे) एम.डी जप्त केले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचे एम.डी. उत्तराखंड येथील एका व्यक्तीकडून विकत आणले असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे पोलिसांनी माहिती घेतली असता हे अंमली पदार्थ मेलतोडा, ता. देवलय, पिथोरगढ़, उत्तराखंड येथे तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून एम.डी तयार करण्याकरीता लागणाऱ्या मशिन व विविध रसायने असा कच्चा माल एकूण १८,५४,५०७/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर एम.डी अंमली पदार्थ बनवणारे टनकपुर, जि. चंपावत, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांना नेपाळ बॉर्डर जवळ उत्तर प्रदेशमधील खीरी जिल्हयातील पलिया पोलीस स्टेशनच्या हद्‌दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने चारचाकी वाहनासह अटक केली. ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनु, भिम सुरेंद्र यादव, अमरकुमार लक्ष्मणराम कोहली अशी या तिघांची नावे असून, यातील दोघजण उत्तर प्रदेश मध्ये एम.डी अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यासंदर्भात कासारवडवली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत.

सदर प्रकरणी पोलिसांनी एम.डी अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मशिन, रसायने तसेच आरोपीनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण ३०,९९,५०७/- रू किंमतीचा मु‌द्देमाल जप्त केला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सदस्वी यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंद, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, सहा. पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोउपनिरी तुषार भाने, स.पो.उप.निरी/चौधरी, पो. हवा/निकम, पोट्या/ शिंदे, पोहया/ काले, पोहवा/सवते, पोहा/पालांडे, पोहवा/काटकर, पो. हवा/पाटील, पो. हवा/आधय, मपोहवा/मिले, मपोहया/महाले, पो.ना/गार्डे, पोना/ बंडगर, पोना/दाणेकर, पो.शि/शेडगे, पोशि/शिकारे, पोशि/यादव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page