सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस हस्तगत…

kalyan – एका सराईत गुन्हेगाराकडून २ गावठी पिस्टल आणि १ जिवंत काडतूस ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हस्तगत करून त्याला कल्याण मधून अटक केली आहे. सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे असे याचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदेला कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा परिसरात सापळा रचून अटक केली. आणि त्याच्याकडून बेकायदेशीर विनापरवाना असलेले २ गावठी बनावटीचे पीस्टल, आणि १ जिवंत काडतुस असा १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर प्रकरणी त्याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच ३० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सुनिल तारमळे करीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध – २, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि /सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/ठाकुर, पोहवा/पाटील, पोहवा /गायकवाड, पोहवा/जाधव, पोहवा/गडगे, पोहवा/राठोड, पोहवा /कानडे, मपोहवा/ पावसकर, पोना/ हासे, पोना/मधाळे, चापोना/हिवरे, पोशि/ वायकर, पोशि/ ढाकणे, पोशि/पाटील, पोशि/शेजवळ, मपोशि/भोसले यांनी केली आहे.