डोंबिवलीत २ कोटी १२ लाख रुपयांचे एमडी जप्त; तिघांना अटक…

dombivali – डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील डाऊन टाऊन, खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये छापा टाकून २ कोटी १२ लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) मानपाडा पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डाऊन टाऊन, खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये छापा टाकून एका आरोपीकडून एकूण १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) कि.अं २.१२ कोटी पेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला. त्यानंतर पसार झालेल्या इतर दोन आरोपींना अटक केली. सदर प्रकरणी तिघांवरही मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, हे तिघेही डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत त्याठिकाणी एमडी ड्रग्सची तस्करी करत होते. हे ड्रग्स ठाण्यासह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्री साठी देत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, सपोनि/कलगोंडा पाटील, सपोनि/संपत फडोळ, पोशि/ बडे, पोशि/दिघे यांनी केली आहे.