भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम!…

new delhi – भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. आज सायंकाळी ५ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.