महाराष्ट्र
दहावीचा निकाल उद्या लागणार…

mumbai – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल.

उद्या निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून आपले गुण ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे.
खाली दिलेल्या लिंकवर निकाल पाहता येईल…
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://mahresult.nic.in