खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस अटक…

kalyan – खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस कल्याण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. परवेज अकबर अली शेख असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याण ता. पोलीस ठाणे हद्दीतील म्हारळगांव, ता. कल्याण येथील सुर्यानगर परिसरात गेल्या १ वर्षांपूर्वी राजन उर्फ जानु श्याम येरकर या १८ वर्ष तरुणाची त्याच्या ४ मिञांनी मिळुन अग्निशस्ञाने गोळी झाडून हत्या केली होती. त्याबाबत कल्याण ता. पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील ३ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
दरम्यान, गुन्हयातील पाहिजे आरोपी परवेज अकबर अली शेख या अटक करण्यात आली नव्हती तो बिहार व इतर राज्यात वास्तव्य करीत होता व अधूनमधून कल्याण परिसरात येत होता. दरम्यान, फळेगांव, ता. कल्याण येथे परवेज येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून परवेजला अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण भरत तांगडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड विभाग, जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक, कल्याण ता. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/मुदगुन, पोउनि/मोरे, पोहवा/बडगे, पोना/भोईर, पोशि/निर्मल, पोशि/बावदाने, पोशि/काळे, पोशि/गुजर यांनी केली आहे.