ठाणे
मुंब्र्यात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यास अटक…

thane – मुंब्र्यात मेफेड्राॅन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. परवेझ खान असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून ६३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले आहे.
मुंब्र्यातील मित्तल मैदान परिसरात एकजण मोकळ्या जागेत एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून परवेझ खानला अटक केली तसेच त्याच्याकडून मोबाईल आणि ६३ ग्रॅम वजनाचे १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचे एमडी अंमली पदार्थ जप्त केले.
सदरची यशस्वी कामगिरी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.