ठाणे

आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे गजाआड… 

ठाणे – आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड येथील सट्टेबाजांना विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. शानू बेरीवाल, रजत शर्मा, विजय देवगन अशी या तिघांची नावे आहेत.

हॉटेल के.एन.पार्क, कोनगाव, भिवंडी येथे छत्तीसगड येथील ३ जण आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक केली.

हे तिघांनी लॅपटॉप मध्ये ‘सुभलाभ’ नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये किकेट मॅचवर जुगार/बेटिंग/सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेल्या सट्टयाची बेटींगची माहिती भरून टॅब मध्ये ‘ताज७७७स्पोर्ट’ अप्लिकेशनवर आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी२० मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतर इसमाकडून ११.८६.८११/ रू. सटटा/बेटिंग स्विकारली. तसेच एका मोबाईलमध्ये ‘सुपर असिस्टंट’ अप्लिकेशनमध्ये बुकी जानू याची १९ नंबरची बुकीची बेटींग लाईन घेऊन तिच्यावर ७,०३,०००/रू.चा जुगार/सट्टा/बेटिंग लावले असल्याचे निदर्शनास आले. तसेच तसेच जुगार/सट्टा/बेटिंग खेळण्याकरीता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राचे आधारे सिमकार्ड घेऊन शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी १२ मोबाईल फोन, १ टॅब व १ लॅपटॉप असे एकूण १,९७,४००/रू चा मुद्देमाल जप्त केला असून, कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले,  पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध २, गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त  शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि/वनिता पाटील, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि /सुनिल तारमळे, पोउनि/विजयकुमार राठोड, सपोउनि / सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/विनोद ढाकणे चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page