लाचखोर भूमी अभिलेख उप अधीक्षक, भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात…

thane – भूमि अभिलेख विभागातील एका भूमि अभिलेख उप अधीक्षक आणि भूकरमापक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. चांगदेव मोहळकर आणि श्रीकांत रावते अशी या दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी या दोघांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जागेशी निगडित रावते यांनी सदरची जमीन मोजणी केलेल्या पोट विषयाची क – प्रत नकाशा करून देण्यासाठी १,००,०००/- रुपयांची मागणी केली तसेच मोहोळकर उप अधीक्षक यांनी यापूर्वी १ लाख ९५ हजार रुपये लाच घेतल्या बाबत एसीबीला तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्याकडे रावते यांनी १,००,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडअंती ७५,०००/- रुपये ची मागणी केल्याने तसेच मोहोळकर यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांच्याकरीता लाचेच्या रक्कमेची मागणी करून तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्याअनुषंगाने एसीबीने सापळा कारवाई दरम्यान रावते यांना लाचेची रक्कम ७५,०००/- रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. मोहोळकर यांना देखील ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.