महाराष्ट्र
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक…

pune – स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
दत्तात्रय गाडे घटनेनंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गुणाट येथे लपून बसला होता. पोलिसांनी ड्रो, डॉग स्कॉड आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचा शोध घेऊन तीन दिवसांनी अटक केली.
दरम्यान, दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्याला शिवाजी नगर कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.