महाराष्ट्र
सोन्याचे गंठण चोरणारा गजाआड…

kolhapur – घरफोडी करून सोन्याचे गंठण चोरणाऱ्या चोरट्यास शिरोळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन लाखांचे गंठण हस्तगत केले आहे. विशाल कुपाडे असे याचे नाव आहे.
फिर्यादींच्या घरातून अज्ञात चोरटयाने २,२०,०००/- रुपये किंमतीचे ४ तोळे वजनाचे गंठण घरफोडी करून चोरी केले असल्याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक करून त्याच्याकडून गंठण हस्तगत केले.