फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक…

kalyan – बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना कल्याण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. मंदार ऊर्फ बबलु गुलाब जैयस्वाल आणि राजेंद्र राजु नायर ऊर्फ रियाज राजु शेख अशी दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना रस्त्यात पडलेली पर्स त्यांच्या ओळखीच्या महिलेची असून, त्यामध्ये काय आहे हे पाहुया असे बोलून बिल्डींगच्या अडोश्याला नेऊन दोघांपैकी एकाने गळयातील चैन काढून दुस-याकडे दिली तसेच फिर्यादीला देखील सोन्याचे कानातले काढून त्या इसमाकडे देण्यास सांगितले. त्यानंतर पर्समध्ये असलेले पिवळया धातुचे बिस्कीट फिर्यादी यांना देऊन हे सोन्याचे आहे तुम्हाला ठेवा कोणाला काही सांगू नका असे बोलून निघून गेले असल्याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंदार ऊर्फ बबलु गुलाब जैयस्वाल आणि राजेंद्र राजु नायर ऊर्फ रियाज राजु शेख या दोघांना अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रा. डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रा. भारत तांगडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड विभाग जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, कल्याण ता. पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ता. पो.स्टे. गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि मुदगुन, पोउनि मोरे, पोना भोईर, पोशि बावदाने, पोशि निर्मल, पोशि काळे, पोशि गुजर यांनी केली असून, गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.