महाराष्ट्र
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांची शिक्षा…

nashik – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोंकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १९९५ च्या सदनिका बनावट कागदपत्र प्रकरणी हि शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायाधिश रुपाली नडवादिया यांनी ३० वर्षांपूर्वी दाखल एका फसवणूक प्रकरणात काेकाटे बंधूना दाेषी ठरवून दाेन वर्षाच्या सश्रम कारावासासह प्रत्येकी पन्नास हजारांचा दंड ठाेठावला.
दरम्यान, काेकाटे बंधूनी तात्काळ १ लाख रुपयांचा दंड भरुन शिक्षेनंतरचा जामिन मिळविला. यानंतर न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.