महाराष्ट्र
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड…

पुणे – ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या सहा जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ते ऑफसेट मशीनवर बनावट नोटा छापत होते. एकूण ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रिटींग मशीनही ताब्यात घेण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या सहा जणांनी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यातून मशीन घेतली, मात्र व्यवसाय तेजीत चालत नसल्याने चीनमधून ऑनलाईन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरु केल्या. ७० हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या, त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी या सहा जणांना अटक केली.