महाराष्ट्र
बसमध्ये महिलेची छेड काढणाऱ्याला चोपलं…
pune – बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला एका महिलेने चांगलाच चोप दिला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (पीएमपीएमएल) बस मध्ये एक महिला आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होती. त्यावेळी बसमध्ये असलेल्या एका व्यक्तीने या महिलेची छेड काढली त्यावेळी त्या महिलेने रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.