डोंबिवली ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस…
dombivali – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ‘ह’ प्रभागामध्ये, गणेश नगर खाडी जवळील भूखंडावर चाळीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, सदर चाळी ह्या ७/१२ च्या जागी असून, विकासक यांनी महापालिकाकडून टॅक्स लावून पाणी कनेक्शन करून घेतले. परंतु आमच्या निदर्शनास असे आले कि, सदरच्या चाळी बांधण्यात आलेला भूखंड हा रेल्वे प्रशासनाचा आहे, तसे रेल्वे विभागाकडून चाळ धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे कि, रूम तुम्ही खाली करा सदर जागा रेल्वे प्रशासनाची आहे.
मग बिल्डर यांनी या जागेवर चाळीचे बांधकाम कसे केले. तसेच टॅक्स लावताना पाणी कनेक्शन घेताना जो ७/१२ दिला तो कोणत्या जागेचा होता. त्याची पडताळणी कल्याण डोंबिवली महालिकेने केली नाही का? महापालिकेने कोणत्या आधारवर त्यांना पाणी आणि वीज देण्यात आली? याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाशी असलेले महापलिकेचे संबंधित आयुक्त, उपायुक्त, ह प्रभागातील वार्ड अधिकारी, कर्मचारी, बांधकाम विभाग यांनी कोणत्या आधारावर रेल्वेच्या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी दिली याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
तसेच बिल्डर राहुल किर, विशाल म्हात्रे, वत्सलाबाई काढे यांनी महापालिका रेल्वे प्रशासन यांची दिशाभूल करून सदर रेल्वेच्या जागेवर चाळी बांधून गरीब लोकांची फसवणूक केली आहे, जर रेल्वे प्रशासनाकडून चाळी तोडल्या तर गरीब लोक रस्त्यावर येतील त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची? अश्या गोरगरीब लोकांना वेठीस धरणाऱ्या बिल्डरांवर प्रशासनाची व नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
तसेच सदर जागेचा आम्ही सर्वे केला असता, महापालिका क्षेत्रामध्ये मोठागाव येथे सुद्धा रेल्वे प्रशासनाच्या जागी चाळीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच कोपरगाव परिसरात सुद्धा चाळी बांधण्यात आल्या आहेत. या सर्व नागरिकांना रेल्वेने नोटीस बजावली आहे. तेव्हा अशा बिल्डरांवर लोकांची फसवणूक केल्याबद्दल तात्काळ सारवासारव न करता गुन्हा दाखल केला पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे बांधकाम ते करणार नाहीत. तसेच या प्रकरणात जितके बिल्डर जबाबदार आहेत त्यापेक्षा अधिक महापालिका जबाबदार आहे. कारण कोणतीही शहनिशा न करता महापलिक या अनधिकृत बांधकामांना परवानगी कशी देते आणि जर का परवानगी दिली नसेल तर पाणी आणि वीज देतेच कशी? असे वारंवार निदर्शनास येत आहे.
कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीत काही दिवसांपूर्वी महारेराचे इतके मोठे प्रकरण उघडकीस आले असून, देखील अजूनही कल्याणा डोंबिवली महापलिकचे डोळे उघडत नाहीत का? अजून किती गोरगरिबांची फसवणूक होणार आहे ? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.