फ्लिप कार्टच्या हबमधून लाखो रुपयांच्या वस्तूंची चोरी; चौघे अटकेत…
dombivali – फ्लिप कार्टच्या हबमधून लाखो रुपये किंमतीचे विविध कपंनीचे मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू चोरी करून त्या विक्रीकरीता आलेल्या चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रणव पांचाळ, प्रंशात शेलार, अमित राणे, अजित राणे अशी या चौघांची नावे आहेत.
काही इसम चोरीचे मोबाईल, लॅपटॉप तसेच इतर वस्तू विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी खंबाळपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे सापळा रचून सदर चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६,३३,६७९/- रूपये किमंतीचे विविध कंपनीचे २३ मोबाईल, २ लॅपटॉप, १ कॅमेरा, ईलेक्ट्रीक फॅन तसेच विविध कंपनीचे एअर बट्स आणि इतर वस्तू अशा एकूण ५० वस्तू हस्तगत केल्या. तसेच त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या सर्व वस्तू त्यांनी मागील ३ महिन्यात वेळोवेळी चक्की नाका, कोळशेवाडी परिसरातील अमेय हॉस्पीटल समोरील फ्लिप कार्टच्या हबमधून चोरी केल्या असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी या चौघांविरुद्ध कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि /संतोष उगलमुगले, पोउपनि/विनोद पाटील, पोलीस अमंलदार विलास कडु, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, सतिश सोनावणे यांनी केली आहे.