महाराष्ट्र
५ लाखांची लाच घेताना न्यायाधीश एसीबीच्या जाळ्यात…
satara – ५ लाखांची लाच घेताना साताऱ्यातील न्यायाधीशांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय निकम असे न्यायाधीशांचे नाव असून, ते जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यांच्यासोबत इतर दोघांचाही समावेश आहे. आनंद खरात आणि किशोर खरात अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे. फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी ५ लाखांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार एसीबीने एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना रंगेहात पकडले.