देश
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू…
new delhi- संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (25 नोव्हेंबर) सुरू झाले आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात सरकार पाच नवीन विधेयके मांडणार आहे. यात शिपिंग क्षेत्राशी संबंधित कोस्टल शिपिंग बिल, इंडियन पोर्ट्स बिल, मर्चेंट शिपिंग बिल या तीन विधेयकांचा समावेश आहे.त्याचबरोबर बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणि वक्फ विधेयकाचा समावेश आहे. तसेच यापूर्वी सादर केलेली 13 विधेयकेही यावेळी मंजूर होण्याची शक्यता आहे.
तसेच अदानी समूहाच्या विरोधातील लाचखोरीचे आरोप, मणिपूर हिंसाचाराबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी केली आहे. यामुळे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.