मुंबई
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड…
mumbai – एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत उदय सामंत यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सत्तास्थापने बाबतचे सर्व अधिकार आणि कोणाला मंत्री करायचे याचेही अधिकार शिंदे यांना देण्यात आले आहेत.