कल्याणमध्ये इमारतीला भीषण आग…
kalyan – कल्याणमध्ये एका इमारतील भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात असलेल्या व्हर्टेक्स हौसिंग सोसायटीमधील १५ व्या मजल्यावरील एका फ्लॅटला संध्याकाळच्या सुमारास हि आग लागली.
माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊनही त्या गाड्या एक तास झाला तरीही काम करत नव्हत्या आसा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. जर वेळेत आग विझवण्याचे काम सुरु झाले असते तर कमीत कमी नुकसान झाले असते असेहि तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटनेवरून केडीएमसी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली असताना देखील वेळेवर आग विझवण्यासाठी यंत्रणा सक्षम नाही हे यातून दिसत आहे.
लोकांच्या जीवाची पर्वा केडीएमसीला करत नाही का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. खरंतर आग लागण्याच्या घटना किंवा इमारती पडण्याच्या घटना या काही सांगून येत नसतात. त्यामुळे त्या त्या वेळी संबंधित स्थानिक प्रशासनाने सतर्क असणे यंत्रणा कार्यक्षम असणे अत्यंत गरजेचे असताना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत हे काय चाललंय? सुदैवाने आजच्या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही. नेहमीच असं होईल हे सांगता येत नाही. कधीही काहीही घडू शकते मग असे असताना केडीएमसी अशी गाफील कशी राहू शकते असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.