रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत…
kalyan – एक महिला रिक्षात ११ तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली बॅग विसरली होती. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर कल्याणाच्या महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ शॊध घेऊन सदर विसरलेली बॅग महिलेला परत मिळवून दिली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार शंकुतला कुरकुटे यांनी गावी जाण्यासाठी पलावा डोंबिवली पूर्वेतून ऑटो रिक्षा पकडली आणि त्या कल्याण एस टी. स्टॅण्ड येथे आल्या असता त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली त्या बॅगेमध्ये ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल आणि रोख रक्कम होती.याबाबत त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने वपोनि ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कल्याण बस डेपो ते पलावा डोंबिवली पूर्व परीसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करून सदर रिक्षाचा शोध घेऊन सबंधित रिक्षा चालकाच्या ताब्यातून तक्रारदार यांची ११ तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली (एकूण ८,००,०००/- रू. किमतींचा मुद्देमाल) बॅग घेऊन ती बॅग तक्रारदार शंकुतला कुरकुटे यांना वपोनिरी यांच्या हस्ते परत दिली.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक विकास मडके, तसेच तपास पथकातील अंमलदार पोहवा मनोहर चित्ते, पोना किशोर सुर्यवंशी, पोना आनंद कांगरे, पोशि दिपक थोरात, पोशि महेंद्र मंझा यांनी केली आहे.