बांग्लादेशी पॉर्न स्टारला अटक…
ambernath – एका बांग्लादेशी पॉर्न स्टार महिलेला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. एक बांग्लादेशी कुटुंब बनावट कागदपत्राच्या आधारे स्वतःची मुळ ओळख लपवून नेवाळी, अंबरनाथ (प) येथे रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून एका बांग्लादेशी महिलेला अटक केली.
तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिला आणि इतर ३ जणांना अमारावती येथे रहाणाऱ्या एका इसमाने भारतातील निवासासंदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून दिली व सदर कागदपत्राच्या आधारे त्यांनी बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याची तसेच हि महिला पॉर्नस्टार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सदर प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर बांग्लादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास हिललाईन पोलीस ठाण्याचे वपोनि ऐ. जी. जगताप हे करीत आहेत.