मुंबई
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड…
mumbai – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे.
काल संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली असून, सदर महिलेने मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून दिली. तसेच कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या महिलेने फेकल्या. आणि त्यानंतर तिथून हि महिला पसार झाली.
दरम्यान, ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या महिलेचा शोध सुरू आहे.