जनावरांची तस्करी करणारे दोघे जेरबंद…
kalyan – म्हशीच्या वंशाच्या जातीच्या एकूण २० जनावरांपैकी १७ म्हशी आणि ३ रेड्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मुस्तफा शफिक शहा आणि अल्लाउद्दीन इमाउद्दिन कुरेशी अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून एकूण १४,८५,०००/- रुपये किमतीच्या २० म्हशी आणि ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचा हद्दीतील आग्रा रोडने दुर्गाडी सर्कल, कल्याण या ठिकाणी काही इसम एका ट्रक मधून म्हशीच्या वंशाच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती डिटेक्शन ब्राचं मधील पोलीस हवालदार सचिन साळवी आणि प्रेम बागुल यांना मिळाली होती. त्याआधारे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डुकले, डिटेक्शन इन्चार्ज API नवनाथ रूपवते तसेच डीबी पथकातील पो.हवा सचिन साळवी,प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, पो.ना राहुल इशी यांनी दुर्गाडी सर्कल कल्याण, येथे सापळा रचून या दोघांना अटक केली.
तसेच सर्व म्हशी समाजसेवक हितेश भांनजी शहा, रिटायर पोलीस अधिकारी पावशे यांच्या मार्फतीने चौधर पाडा, बापगाव ता.भिवंडी येथील गौशाळा येथे सुरक्षितेच्या दृष्टीने संतोष पाटील यांच्या ताब्यात दिल्या असून, गुन्ह्याचा पुढील तपास API नवनाथ रुपवते हे करीत आहे.