२० लाखांसाठी महिलेचा छळ; गुन्हा दाखल…
dombivali – २० लाखांसाठी एका महिलेचा तिच्या सासू, सासरे आणि नवऱ्याने छळ केला असल्याची तक्रार स्वतः महिलेने राम नगर पोलीस ठाण्यात दिली असून, सदर तक्ररारीवरून राम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षता मोरे असे महिलेचे नाव असून, ऋषीराज धनराज मोरे (नवरा), धनराज मोरे (सासरे), रुचिरा धनराज मोरे (सासु) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२२ या दरम्यान छळ करण्यात आला आहे. बकरी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी तू तुझ्या माहेरहून २० लाख रूपये घेऊन ये म्हणून सदर महिलेच्या सासरची मंडळी मागे लागली होती. परंतु महिला पैसे आणत नसल्याने तिचा छळ करण्यात येत होता. वारंवार छळ होत असल्याने अखेर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे करत आहेत.