व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेले तिघे गजाआड…
dombivali – व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची (६,२०,००,०००/- रु. ची) व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. अनिल राधाकृष्ण भोसले, अंकुश शंकर माळी, लक्ष्मण शंकर पाटील अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
काही इसम व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी मौर्या धाब्याच्या बाजूला, बदलापूर पाईपलाईन रोड, मानपाडा, डोंबीवली पूर्व येथे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुषंगाने कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकणी सापळा रचून तिघांना अटक करून त्यांच्याकडून ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची (६,२०,००,०००/- रु. ची) व्हेल माशाची उलटी आणि गाडी तसेच विविध कपंनीचे मोबाईल फोन असा एकूण ६,२२,१५०००/- रूपये किंमतीचा मुदद्देमाल जप्त करून सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि संतोष उगलमुगले, सपोनि संदिप चव्हाण, सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विश्वास माने, पोहवा विलास कडु, पो. कॉ. गुरूनाथ जरग, पो.कॉ.मिथुन राठोड, पो.कॉ.गोरक्ष शेकडे यांनी केली आहे.