डोंबिवली पश्चिमेतील अनधिकृत चाळी तोडण्याचे आदेश देऊनही अजूनही कारवाई नाही?

dombivali – पश्चिम ‘ह’ प्रभाग क्षेत्र परिसरात असलेल्या अनधिकृत चाळी तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी देऊनही अजूनही या अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

आयुक्त अभिनव गोयल यांनी ‘ह’ प्रभाग क्षेत्र संबंधित अधिकाऱ्यांना डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील कोपर गाव खाडी किनारी, देवीचा पाडा स्मशानभूमी, मोठागाव, मेंग्या आजो मंदिर, दार गणपती विसर्जन तलाव, अनमोल नगरी परिसर, कोपर भागातील म्हाळसाई चाळ, जुनी डोंबिवली कुंभारकणपाडा परिसरातील अनेक अनधिकृत चाळी जमनीदोस्त करण्याचे आदेश साधारण २ ते ३ आठवड्यांपूर्वी दिले आहेत. तरीही अजूनही या अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, डोंबिवली पश्चिमेत असलेल्या या चाळींचे बांधकाम गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सुरु आहे. महापालिकेत प्रशासन व्यवस्था असल्यापासून या चाळींचे काम जोरदार सुरु आहे. आता महापालिका निवडणूक झाल्या आहेत. शिवाय महापालिका निवडणूक होण्याआगोदरच या चाळी तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक होऊन १५ दिवस उलटूनही अजूनही या अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे ‘ह’ प्रभाग क्षेत्र परिसरातील या अनधिकृत चाळी ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आल्या आहेत का? म्हणून अजूनही या अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यात आलेली नाही? तसेच आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत पण तरीही या चाळींवर कारवाई न करता अजून (खासदार, आमदार, नगरसेवक ) कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय?



