मुंबई
मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू…
mumbai – मॅनहोलमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ हि घटना घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार, सीप्झजवळ मेट्रो लाईन- ३ चे काम सुरू आहे तेथील एक मॅनहोलचे झाकण उघडे होते. चालता चालता हि महिला त्या मॅनहोलजवळ पोहोचली, मुसळधार पावसामुळे ते झाकण उघडे असल्याचा तिला अंदाज नव्हता. त्यामुळे ती खाली पडली आणि वाहून गेली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाने घटनास्थळी धाव घेतली. आणि त्या महिलेला नाल्यातून बाहेर काढले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला.