मुंबई

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाचे ताशेरे…

mumbai – अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने पोलिसाना चांगलंच झापलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या डोक्यात का गोळी घातली? पोलीस डोक्यात गोळी घालतात कि पायावर? असा सवाल करत हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही, एन्काऊंटर करण्याची हि व्याख्या नाही असं म्हणत कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 

बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. यावर आक्षेप घेत त्याच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणावर आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. चार पोलीस असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला?, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसंच, पिस्तूल चालवायला ताकद लागते. साधा माणूस ते चालवू शकत नाही. याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही. तातडीने अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करा., असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले.

सरकारी वकिलांच्या उत्तरानंतर कोर्टाने सांगितले की, तुम्ही जे सांगताय ते सत्य मानायला कठीण आहे. साधा माणूस पिस्तुल वापरु शकत नाही. त्याला ताकद लागते असे म्हणत पिस्तुल लॉक का ‌नव्हतं? जर एखादा आरोपीला असं घेऊन जाता तर इतका निष्काळजीपणा का?, असा सवाल कोर्टाने यावेळी केला. पिस्तुलवर आरोपीच्या हाताच्या खुना असायला पाहिजेत. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा., असे कोर्टाने सांगितले. तसंच, आरोपीने तीन बुलेट झाडल्या होत्या. एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत. असा प्रश्न देखील कोर्टाने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page