एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता…
new delhi – एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक सादर केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं आज स्वीकारल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या संदर्भातल्या विविध कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर याची अंमलबजावणी कधीपासून करायची याची तारीख निश्चित होईल, पण सरकारच्या याच कार्यकाळात याची अंमलबजावणी सुरू होईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच स्पष्ट केलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गेल्यावर्षी स्थापन केली होती. समितीकडे आलेल्या ८० टक्के प्रतिक्रिया या प्रस्तावाच्या बाजूनं होत्या. बहुतांश राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, असं वैष्णव म्हणाले. समितीच्या शिफारशींवर आता देशभरात मोठ्या प्रमाणात विस्तारानं चर्चा होईल आणि सहमती निर्माण केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.