सराईत गुन्हेगाराकडून ६० ग्रॅम एम.डी जप्त…
Thane – सराईत गुन्हेगाराकडून मुंब्रा पोलिसांनी एकूण ६० ग्रॅम मोफेडीन (एम.डी) जप्त करून त्यास अटक केली आहे. इम्तियाज दाउद मर्चेंट असे याचे नाव आहे.
काही दिवसांपासून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुषंगाने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे इम्तियाज दाउद मर्चेंटला अटक करून त्याच्याकडून १ लाख रुपयांचे एकूण ६० ग्रॅम मोफेडीन (एम.डी) जप्त केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर अशितोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१, ठाणे, सुभाष बुरसे, तसेच सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग, उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/पाचोरकर, सपोनि/रोहीत केदार, सपोनि/गणेश जाधव, पोहवा / मोरे, पोहवा /राजपुत, पोशि/वसिम तडवी, पोशि/रौफ खान यांनी केली आहे.