लोकलमध्ये तरूणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला…

dombivali – धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून ३ जणांवर चाकू हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आला. शेख जिया हुसेन असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असून, डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन कल्याणहून दादरला जात होती. त्यावेळी शेख जिया हुसेन याला मुंब्र्याला उतरायचं होतं. मात्र त्याला उतरायला जागा मिळत नव्हती. त्याला जेव्हा माहिती पडलं की ही फास्ट ट्रेन मुब्रा येथे थांबणार नाही तेव्हा तो लोकांना धक्का मारून दरवाजाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र त्याला जागा मिळत नव्हती, त्यानंतर त्याने त्याच्यासमोर असलेल्या प्रवाशांना धक्का मारून दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लोकलमधील काही प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला. आणि राग आल्याने त्याने चाकू काढून तीन जणांवर हल्ला केला. दरम्यान, हल्ल्यात प्रवाशी जखमी झाले.