मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ…
महाराष्ट्र – मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांना शिवीगाळ केली आहे. प्रसाद लाड माझ्या नादी लागू नको. अशा शब्दात जरांगेंनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे यांना देवेंद्र द्वेष हा रोग झालाय असे प्रसाद लाड यांनी म्हंटले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे यांनी लाड यांना शिवीगाळ केली.
जरांगे म्हणाले, ४०० ते ५०० मुलांना ठाण्यात कुणबी प्रमाणपत्र असताना बाहेर काढलं आणि ओपन कॅटगरीमध्ये टाकलं. तुला जर मराठ्याची काय आस्था असेल ना, ते देवेंद्र फडणवीसनं का केलं ते विचार त्याला, माकडा, कुठेही शेण खातो आणि कुठंही बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटतो का त्याची थुका, भंगार सगळ्या दुनियाचा तू, माझ्या पोराचं वाटोळं झालंय, तुला काय होतंय.
हे कोण आहे बांडगुळ, मनोज जरांगे यांच्या नादी लागू नये, देवेंद्र फडवणीस यांचे तू पाय चाट, त्यांचा थुका चाट, तू माझ्या नादी लागू नको, अशा शब्दात जरांगे यांनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच तू देवेंद्र फडणवीस यांचे पॅन्ट शर्ट काढून बघ, त्याला कुठला रोग झाला आहे ते.? असंही जरांगेनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे २० जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.