मुंबई
विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती…
मुंबई – उच्च न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती दिली आहे. याबाबत उच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आणि विशाळगडावरील कारवाई तातडीने थांबवण्याचे निर्देशही दिले.
पावसाळ्यात कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसेच भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? असा सवालही न्यायालयाने विचारला. आणि विशाळगडावर आंदोलकांनी मशिदीवर चढाई केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप गंभीर आहे, असे निरीक्षणहि न्यायालयाने नोंदवले आहे.