देश-विदेश
जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन…
जगात मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जगातील कामकाज ठप्प झाले असून, याचा परिणाम उड्डाणे, विमानतळ, बँका आणि शेअर बाजारासह सर्व क्षेत्रांवर झाला आहे.
एअरपोर्ट्वर विमान सेवा ठप्प झाली आहे. तर अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतातील एअरपोर्ट, विमान सेवेवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीने या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.