मुंबई
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला…
Mumbai – ग्रँड रोड स्टेशन परिसरातील एका ४ मजली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. रुबिनिसा मंझील असे या इमारतीचे नाव असून, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसह काही भाग कोसळला. महानगरपालिकचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेत ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे.