अवैधरित्या पिस्टल बाळगणारा गजाआड…

kalyan – अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्यास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. करण जितु निशाद असे याचे नाव आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नेतीवली परिसरात एक इसम पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी नेतीवली कल्याण पूर्व परिसरात सापळा रचून जुने धान्य गोडावून जवळून करण जितु निशादला अटक केली. त्याच्याजवळ एक स्टील धातुचे पिस्टल मिळून आले. त्याची किंमत १ २५,०००/- रु. इतकी आहे.
मिळलेले पिस्टल पोलिसांनी जप्त केले असून, सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि नं. १२/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह म.पो.का. क३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरी. संदिप भालेराव हे करत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परि.०३ कल्याण अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी पोलीस ठाणे हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पोहवा विशाल वाघ, पोहवा गोरखनाथ घुगे, पोहवा सचिन आव्हाड, पोहवा दत्तू जाधव, पोना दिलीप कोती यांनी केली आहे.



