देश

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा भीषण अपघात…

उत्तर प्रदेश – गोंडा जिल्ह्यात चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातमध्ये रेल्वेचे १० ते १२  डबे रुळावरून घसरले असून, यात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन चंदीगडहून येत होती. उत्तर प्रदेशातील झिलाही रेल्वे स्थानक ते गोसाई दिहवा दरम्यान हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page